Type Here to Get Search Results !

गोळीबार करणाऱ्या तिघांचे पलायन पाळत ठेवणारे चार इसम अटकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची धडाकेबाज कारवाई.

 


सोलापूर (प्रतिनिधी ) 

मुळेगाव तांडा क्रॉस रोडवरील अॅपेक्स स्टील कंपनीचे मालक इब्राहिम मोतीवाला यांच्या चालकाला अडवून रोकड लुटण्या प्रयत्न सात जणांनी केला होता. पण, चालक एजाज तांबोळी याच्या प्रसंगावधानामुळे गोळीबार करूनही दरोडेखोरांचा लुटीचा डाव फसला. यात सोलापूर तालुका पोलिसांनी रेकी करणाऱ्या सुफियान महादेव श्रीकांत व अंकुश या चोघांना 

जेरबंद केले. चौघेही उळे, बोरामणी परिसरातील आहेत. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे 


स्टील व्यापारी इब्राहिम मोतीवाला यांचा चालक दररोज रात्री दहाच्या


सुमारास दिवसभर जमा झालेली रोकड घेऊन घरी जातो. यासंदर्भात दरोडेखोरांनी सहा दिवसांपासून पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एका कारमधून चौघे आणि दोन दुचाकीवरून तिघे आले आणि ते मुळेगाव क्रॉस रोडजवळ थांबले. पण, कार कधी कंपनीतून बाहेर येते. याचा अंदाज घेण्यासाठी दुचाकीवरील तिघेजण सतत रेकी करीत होते. एजाज कार घेऊन बाहेर पडताच काही अंतरावरील तिघांनी एजाजच्या दिशेने गोळीबार केला. त्यांना वाटले की,गोळीबार करताच एजाज कारमधून पळून जाईल. पण, एजाजने कार आहे तशीच रिव्हर्स (मागे) घेत थेट स्टील कंपनीत नेली. त्या ठिकाणी कामगार, सीसीटीव्ही असल्याने दरोडेखोर पसार झाले. पोलिसांनी 'सीसीटीव्ही'च्या आधारे चौघांना अटक केली. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि दरोड्याचा प्रयत्न, अशा कलमांतर्गत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.