Type Here to Get Search Results !

महिलांवरील आत्याचार सहन केले जाणार नाहीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत स्वप्निल लिंबोळे जिल्ह्यातून तडीपार

 



​सोलापूर (प्रतिनिधी ) महिला आणि मुलींची छेडछाड करून शहरात दहशत माजवू पाहणाऱ्या मुजोर गुंडांची मस्ती जिरवण्यास फौजदार चावडी पोलिसांनी जोरदार सुरुवात केली आहे. बुधवार पेठेतील महिला छेडछाड आणि अत्याचाराच्या गुन्ह्यांत सराईत असलेल्या एका गुंडाचा माज फौजदार चावडी पोलिसांनी पुरता उतरवला असून, त्याला सोलापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातून १ वर्षासाठी थेट (तडीपार) केलं आहे 


​स्वप्निल आनंद लिंबोळे (वय १९ वर्षे, रा. ८१, वडर गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) असे या युवकाचे नाव आहे 

​आरोपी स्वप्निल लिंबोळे हा वयाने लहान असला तरी त्याचे कारनामे अत्यंत गंभीर आहेत. त्याच्याविरुद्ध सन २०२३ आणि २०२५ या कालावधीत महिलांवर अत्याचार आणि छेडछाडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवार पेठ आणि वडर गल्ली परिसरात त्याने महिलांना त्रास देऊन दहशत निर्माण केली होती. अखेर या गुंडाला धडा शिकवण्यासाठी फौजदार चावडी पोलिसांनी कंबर कसली. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि त्यांच्या पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये याच्या तडीपारीचा अत्यंत कडक प्रस्ताव तयार केला.


​गुन्हेगारांची सोलापुरात गय केली जाणार नाही, हा कडक संदेश देण्यासाठी पोलीस उपायुक्त (परिमंडळ), प्रितम यावलकर यांनी या प्रस्तावावर तात्काळ आणि कठोर पाऊल उचलले. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत थेट तडीपारीचा आदेश (जा.क्र. १८८४/२०२६ दि. १६/०७/२०२६) जारी केला. या आदेशानुसार आता या गुंडाला सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सीमेत पाऊल ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एकंदरीत कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही त्याच बरोबर फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील महिला वरील होणारा अत्याचार कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही , स्वप्नील लिंबोळे याच्या तडीपार कारवाईमुळे फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या धडक कारवाईने नागरिकांमधून व विशेष महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.