अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांचेकडोल शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2023 व मा. कक्ष अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांचेकडोल पत्र दिनांक 1 एप्रिल 2026 अन्वये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटूंब एक साडी मोफत वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.
गोदाम व्यवस्थापक शासकीय धान्य गोदाम रामवाडी शहर यांनी त्यांना दिनांक 15 जून 2026 रोजी संबंधित पुरवठादार यांनी साडया पुरवठा केले बाबत गोदाम व्यवस्थापक कार्यालयास साड्या प्राप्त झाले आहे. साडयाचे वितरण श्रीराम नवमी दिनांक 26 मार्च 2026 पासून करण्याबाबत कळविले आहे.
शासनाने साड्या मंजुर करताना खालील प्रमाणे सुचना दिलेल्या आहेत.. गोदामात येणारे साडयांचे गठ्ठे तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणा-या साडयांच्या गठठ्यांची नोंद Online पध्दतीनेच ठेवणे आवश्यक आहे, त्यानुसार AePDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी.
सदर योजनेंतर्गत साडयांचे वितरण श्रीराम नवमी दिनांक 26 मार्च 2026 पासून या सणांच्या दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्त भाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभागाव्दारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळविण्यात आलेले आहे.
. पुरवठा करावयाच्या साडीच्या 100 साडया म्हणजे एका गाठीचे वजन हे 41 ते 46 किलो इतके राहील.सदर साडयाचे वाटप ई-पॉस मशीनव्दारे करण्यात यावे.सबब महामंडळाकडून तालुका गोदामापर्यंत ज्याप्रमाणे साडयांचा पुरवठा करण्यात येईल त्याप्रमाणात तात्काळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपर्यंत साडयांचे वाटप करण्याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी ज्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना दोन वेळेस साडयांचे वाटप करण्यात आलेले आहे. अशा शिधापत्रिकाधारक कुटूंबांना या योजनेतून सन 2025-26 करीता पुरविण्यात येणाऱ्या साडयांमधून वितरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटूंब एक साडी मोफत याप्रमाणे परिमंडळ अधिकारी अ,ब, क व ड यांना खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.
अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका / मंजूर साडया सन 2025-26
सन 2024-25 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या साड्यांपैकी परिमंडळ कार्यालय अ विभाग सोलापूर (28), परिमंडळ कार्यालय ब विभाग सोलापूर (18), परिमंडळ कार्यालय क विभाग सोलापूर (14), परिमंडळ कार्यालय ड विभाग सोलापूर (36), अशा एकूण 96 साड्या शिल्लक आहेत.
सन 2025-26 या चालू वर्षी वितरीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या साड्या परिमंडळ कार्यालय अ विभाग सोलापूर (827), परिमंडळ कार्यालय ब विभाग सोलापूर (1601), परिमंडळ कार्यालय क विभाग सोलापूर (2019), परिमंडळ कार्यालय ड विभाग सोलापूर (1458), अशा एकूण 5985 साड्या आहेत.
तसेच मागील वर्षातील शिल्लक साड्या 96 व चालू वर्षी वितरीत करावयाचे 5985 अशा एकूण 6081 साड्या वितरीत करण्यात येणार आहेत.
मा. कक्ष अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 1 एप्रिल 2026 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार परिमंडळ अधिकारी अ, ब, क आणि ड विभाग, सोलापूर यांनी तात्काळ साडयाचे परमिट निर्देशन पत्रासह वाहतुक प्रतिनिधी यांचेकडे तात्काळ पोहोच करावे.
तसेच गोदाम पर्यवेक्षक यांनी साडयाचे परमिट निर्देशन पत्रानुसार संबंधीत रास्त भाव दुकानदार यांना त्वरीत साडयांचे वितरण करावे असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी केले आहे.
