सोलापूर (प्रतिनिधी ) चोरटे त्यांनी चोरलेले दागिने ५० टक्के किंमतीतदेखील विकतात. काहीजण पावतीशिवाय दागिने घेतात. मात्र, कोणतीही खात्री न करता एखाद्याने बेकायदा मार्गाने आणलेले किंवा संशयास जागा असतानाही दागिने विकत घेतल्यास तो सराफदेखील चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी होऊ शकतो, अशी माहिती शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली
सोन्याचा भाव सध्या दीड लाखांपर्यंत असल्याने चोरट्यांचे लक्ष दागिन्यांवरच आहे. कमी वेळेत दागिन्यांमधून जास्त पैसा मिळतो, हा त्यामागील उद्देश असतो. चोरीचे दागिने चोरटे काही दिवसांनी विकतात
मात्र, भारतीय न्याय संहितेतील कलम ३१७ (२) नुसार चोरीची मालमत्ता बाळगणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा आहे. कोणतीही मालमत्ता (पैसे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स
वस्तू) चोरीची आहे किंवा ती बेकायदेशीर मागनि मिळवली आहे, हे पूर्णपणे माहीत असूनही किंवा
तसा संशय येण्यास वाव असतानाही ती अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा मानला जातो यात दोषी आढळून आल्यास संबंधीत व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत तुरुंगावास किंवा आर्थिक दंड अशी शिक्षा होऊ शकते न्यायालयाच्या माध्यमातून अशा गुन्ह्यात ती वस्तू खरेदी करणाऱ्यास दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते, असे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले
सोलापुरातील कल्याणनगर ये शिवबाळा भांजे यांच्या घरातून दागिने चोरीस गेले होते. चोरट्यांकढील दागिने एका सराफाने खरेदी केले होते त्याच्यावरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
*वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी शहर गुन्हे शाखेचा पदभार घेताच घरफोडीच्या गुन्ह्यात कमालीची घट*
मागील वर्षी मे महिन्यात सोलापूर शहरात जबरी चोरीचे 29 तर घरफोडीचे 42 गुन्हे घडले होते मात्र यंदाच्या मे महिन्यात जबरी चोरीचे आठ आणी घरफोडीचे 22 गुन्हे दाखल झाले आहेत गतवर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चोरीचे 239 गुन्हे दाखल झाले होते त्यात तब्बल 65 गुन्ह्यांची घट झाल्याचे रेकॉर्डवरून समोर आलं आहे शहर गुन्हे शाखा अन स्थानिक पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.
