गुन्ह्यातील आणखी एक संशयित मंजित कुमार (रा. बरवालिया, ता.सलोन जि. रायबरेली, उत्तर प्रदेश) व सराफ लक्ष्मण गणेश रणशिंगे (वय २७,
रा. गोंधळे नगर, हडपसर, पुणे), संतोष विलास साबळे (वय २९, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) यांचा त्यात समावेश आहे. 25 मे रोजी रात्री कल्याणनगर भागातील एका बंद घराचे सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील २१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता . मुख्य संशयित सूरज सिहं टाक याला हडपसर (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार मंजीत कुमार याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील काही दागिने त्याने सराफ लक्ष्मण रणशिंगे आणि संतोष साबळे यांना विकल्याचेही निष्पत्र झाले. या दोघांना ताब्यात घेऊन
त्यांच्या कडून १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच उर्वरित चोरीचे दागिने सराफ अब्दुल शेख याने चोरीचे असल्याची माहिती असतानाही खरेदी केल्याचे तपासात अटक करण्यात आली.ही चॅलेंजीग कामगिरी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली
सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडेकर विनोद रजपुत, इम्रान जमादार धीरज सातपुते उमेश पवार सुभाष मुंढे वसीम शेख, काशिनाथ वाघे यांनी पार पाडली
