Type Here to Get Search Results !

पदभार स्वीकारताच अल्फाज शेख यांच्या धडाकेबाज कारवाई ला सुरवात कंबरेला गावठी कट्टा बाळगणारा तरुण जेरबंद.




​सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी एका इसमाला बेड्या ठोकल्या आहेत. या इसमाच्या झडतीमध्ये त्याच्या कंबरेला लावलेला एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) जप्त करण्यात आला आहे.


​मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; गुप्त बातमीदाराने दिली टीप

​दिनांक २७ जून २०२६ रोजी रात्री २३:०० ते २८ जून २०२६ रोजी पहाटे ०४:०० वाजेच्या दरम्यान सोलापूर पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. या ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. 


"सोलापूर-अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल (BSNL) टॉवरजवळ, सर्विस रोडवर एक तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून उभा आहे," अशी ती माहिती होती.


​पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न; 

पाठलाग करून आवळल्या आवळल्या बेड्या


​माहिती मिळताच एमआयडीसी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ अक्कलकोट रोडवरील सर्विस रोडच्या दिशेने रवाना झाले. त्या ठिकाणी पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक संशयित इसम उभा असलेला दिसला. पोलिसांची गाडी पाहताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

​त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला देशी बनावटीचा एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आढळून आला.


​परवान्याबाबत उडवाउडवीची उत्तरे; गुन्हा दाखल


​पकडण्यात आलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव नितीश अनिल चव्हाण (वय ३२ वर्षे, सध्या रा. स्वामी समर्थ मंदिराशेजारी, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर; मुळ रा. मु.पो. होटगी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असल्याचे सांगितले.


​गावठी कट्टा जवळ बाळगण्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याची मागणी केली, मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. हे बेकायदेशीर शस्त्र त्याने कुठून आणि कोणाकडून आणले, याबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. विनापरवाना बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी नितीश चव्हाण याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात 'भारतीय शस्त्र अधिनियम १९५९' चे कलम ३, २५ सह 'महाराष्ट्र पोलीस अधिनियम' कलम १३५ प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ६३१/२०२६) दाखल करण्यात आला आहे.


​          यांनी केली कामगिरी

​सदरची धडक कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोहेकॉ/१२७ राकेश पाटील, पोकॉ/१६१८ सुहास अर्जुन, पोकॉ/१४६२ नागेशसिंग चव्हाण, पोकॉ/१७९६ अमरसिंग शिवसिंगवाले आणि पोकॉ/९३१ अविनाश डिगोळे यांच्या पथकाने बजावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.