Type Here to Get Search Results !

स्वामींचे वटवृक्ष मंदिर शांती व समाधानाचे केंद्र - मा.शिक्षण मंत्री दीपक केसरकर




  सोलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरपरिषदेचे नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी माजी मंत्री केसरकर यांचा श्रीफळ, स्वामींचे कृपावस्त्र व स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार केला. दर्शनानंतर

बोलताना मा.शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की वटवृक्ष मंदीर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येऊन मनाला शांती व समाधान मिळते म्हणुन स्वामींचे वटवृक्ष मंदिर शांती व समाधानाचे केंद्र असल्याचे मनोगत व्यक्त केले. यानंतर केसरकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली व देवस्थानच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती घेतली.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक ननू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, सचिन पवार, विपूल जाधव, भैय्या गायकवाड, श्रीकांत मलवे आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.