Type Here to Get Search Results !

अमित कांबळे यांची रिपब्लिकन सेनेच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी निवड ​सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे आढावा बैठक उत्साहात संपन्न.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक सोलापूर येथील हॉटेल प्रथम (सात रस्ता) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या विस्तार, बळकटीकरण आणि आगामी धोरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अमितजी कांबळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची दखल घेत सरसेनानींनी त्यांची 'सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष' पदी नियुक्ती जाहीर केली.

या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल स्मारक प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर राष्ट्रीय महासचिव संजीव बावधनकर 

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष 

 ॲड. सुशील सूर्यवंशी प्रदेश सचिव सोमनाथ भोसले

आणि विश्वजीत सरवदे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते अमित कांबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

*​२३ वर्षांच्या अनुभवानंतर संघटनेत प्रवेश:*

अमित कांबळे यांनी गेली २२ ते २३ वर्षे पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी रिपब्लिकन सेनेची विचारधारा स्वीकारली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा ठाम विश्वास आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला व नियुक्ती सोहळ्याला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मध्ये 

शरणू हजारे, आशाताई रिकिबे, सुनीता सरवदे, राधाबाई गायकवाड, रेश्मा मंगलगिरी, सचिन जाधव, विश्वास उगाडे, महिबुब शेख, दाऊद मुलाणी, वाहिद मुस्तफा, सद्दाम पठाण, विकी बनसोडे, राज सोनवणे, नवीलाल खरादी, जमीर सय्यद, शहानवाज शेख, जावेद मुस्तफा, महबूब चाऊस, इमाम शेख, शरबुद्दीन पठाण, इक्बाल तांबोळी, इम्रान पठाण, इस्माईल शेख, मोहसीन बागवान, अमीर शेख, इस्माईल सातखेड, विकास सरवदे, गोरख सरवदे, फुलचंद सरवदे, आकाश सरवदे, रमेश गायकवाड, मतीन सातखेड, प्रशांत कोळी, अनिल कुरुडे, परवेझ इनामदार, एजाज मंगलगिरी आणि अबूबकर उस्ताद यांसह रिपब्लिकन सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


*​पक्षवाढीसाठी सज्ज होण्याचे आवाहन:*

बैठकीत सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नूतन जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनीही, सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेचा झेंडा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.