Type Here to Get Search Results !

स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो - पोलीस आयुक्त एम. राजकुमार श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे मनोगत.




सोलापूर (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पुनित झालेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावलो असल्याचे मनोगत सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी व्यक्त केले. पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन सपत्निक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची भौगोलिक रचना व मंदीरातील वटवृक्षाचा इतिहास, व मंदीरातील दीनक्रम प्रथमेश इंगळे यांच्या कडून जाणून घेतल्यानंतर पोलीस आयुक्त एम.राजकुमार बोलत होते. प्रारंभी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांचं स्वागत व दर्शनानंतर सपत्निक स्वामींचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. पोलीस आयुक्त एम राजकुमार पुढे बोलताना म्हणाले की वटवृक्ष हा फक्त झाड नाही, स्वामी समर्थांचं जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांपेक्षा जास्त झाले तरी हा वटवृक्ष आजही हिरवागार आहे. पारंब्या जमिनीत जाऊन नवीन खोड तयार झालंय. थोडक्यात हा वटवृक्ष म्हणजे स्वामींचा देह आहे. अक्कलकोटला येऊन

स्वामींसह अशा या ऐतिहासिक वटवृक्षाचं दर्शन घेतल्याने जीवन धन्य झाले आहे असे सांगून मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदर तिथ्याबद्दल समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचे आभार मानले. यावेळी पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलिस निरीक्षक दिपक भिंताडे, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, समर्थ स्वामी, तुषार मोरे, लखन सुरवसे, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.