सोलापूर (प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत सोलापूरचे नूतन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान संचलीत कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी नूतन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे
यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नूतन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
