Type Here to Get Search Results !

वळसंग पोलिसांनी जप्त केलेली बनावट दारू केली नष्ट.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) याबाबत अधिक माहिती अशी की यातील दाखल गुन्हा क्रमांक 35/2026 बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर वळसंग पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सदर कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले मुद्देमाल म्हणजेच दारू हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नष्ट करण्यात आले आहे" दरम्यान ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर, एच डी पी ओ यामावर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून" एक्साईज पोलीस इन्स्पेक्टर अविनाश घाटे यांनी दोन पंचासमक्ष सदर गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट केले" सदर प्रक्रिया ही पूर्णतः कायदेशीर तरतुदीचे पालन करून पार पडण्यात आले असून अशा प्रकारच्या अवैध दारू निर्मितीवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आले" दरम्यान सदरची यशस्वी कामगिरीही वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, मुद्देमाल कारकून महिला हवालदार अनिसा पटेल, पोलीस हवालदार अशोक पाटील, पोलीस हवालदार श्रीशैल माळी, पोलीस हवालदार संतोष चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दूधभाते पोलीस हवालदार रामदास मालचे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे, यांनी केली असून या कारवाईमुळे वळसंग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतानाचे चित्र दिसून येत आहे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.