Type Here to Get Search Results !

जेलरोड पोलिसांना आव्हान देत भरदिवसा फर्निचर व्यावसायिकाची ४ लाखांची रोकड लंपास, शांती चौकातील घटना.




सोलापूर (प्रतिनिधी ) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका फर्निचर व्यावसायिकाची तब्बल चार लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी २.५० जण्याच्या सुमारास शांती चौकात घडली या प्रकरणी अनोळखी दोघा चोरट्या विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यातील फिर्यादी भारत हनुमंत चलवादी (वय ५१, रा. शास्त्रीनगर, एसटी बसस्थानक क्रमांक दोन समोर)यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. दरवाजा बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या खरेदीसाठी त्यांनी बँकेतून चार लाख रुपये काढले होते.ही रक्कम त्यांनी एका बॅगेत ठेवली होती ती बॅग दुचाकीवर एम 

१३ डीसी ०९७०) पायाजवळ ठेवून ते आपल्या दुकानाकडे निघाले होते.


शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळील शांती चौक परिसरात ते आले असता, मागून दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या पायाजवळ ठेवलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. या झटापटीत चलवादी दुचाकीवरून खाली पडले. काही समजण्याच्या आतच चोरटे विव्हको प्रोसेसच्या दिशेने पसार झाले.


दुचाकीवरून पडल्यामुळे चलवादी यांच्या पायाला मुकामार लागला. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.


पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अद्याप चोरट्यांची ओळख पटलेली नाही. गुन्हे शाखा व जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.