Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात : प्रा. अपेक्षा चाकोते वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प.




सोलापूर (प्रतिनिधी ) बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी 770 शरणांना घेऊन अनुभव मंडपाची स्थापना केली. त्या 770 शरणांमध्ये 700 पुरुष होते तर 70 स्त्रीशरणी होत्या. हीच स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली असे प्रतिपादन प्रा. अपेक्षा चाकोते (मुंबई) यांनी केले.

           महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्यावतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सौ. चाकोते बोलत होते. 'स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते : महात्मा बसवेश्वर' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चव्हाण, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुचित्रा थळंगे, वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आशा पाटील व सचिवा माधुरी बिराजदार उपस्थित होते. 

             यावेळी चाकोते म्हणाले की आता संसदेचे विशेष अधिवेशन अधिवेशन सुरू आहे. तिथे स्त्री आरक्षणाचा विषय आज मांडला जात आहे तर बसवण्णांनी 12 व्या शतकातच अनुभव मंडपाच्या माध्यमातूनच महिलांना आरक्षण दिले होते. महात्मा बसवेश्वर यांनी स्त्रियांना विचार स्वातंत्र्य, वारसा स्वातंत्र्य, विधवा पुनर्विवाह स्वातंत्र्य, कायक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य दिले.

           यावेळी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. डॉ.चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. संजय नीला, वीरेंद्र हिंगमिरे, बाबा बाबरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, योगेश कापसे, रेश्मा निडगुंदी आदी उपस्थित होते. 

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी, स्वागत आशा पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभदा शिवपुजे-उपासे यांनी केले. आभार प्रदर्शन साक्षी हौदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर अतनुरे, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले, राहुल बिराजदार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.