Type Here to Get Search Results !

एमडी' ड्रग विक्रीस आलेले दोघे अटकेत चार दिवसाची पोलीस कोठडी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची सिनेस्टाईल कारवाई

 '



सोलापूर (प्रतिनिधी ) मुंबईतून पुणेमार्गे ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन 

 सोलापूर शहरात आलेल्या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता. २३) त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (२६ एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी संशयितांची नावे आहेत. ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी जेलरोड पोलिसांनीच डाव टाकला होता. त्यात दोघेही सहजपणे अडकले.


सोलापूर शहरातील तरुणांना त्यांच्या मागणीनुसार काही तरुण मुंबई, पुण्यातून एमडी ड्रग्ज आणून देतात, अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी पकडण्यासाठी डाव रचला 

 त्यानुसार सुफियान व तौफिक चारचाकी गाडी घेऊन 'एमडी' ड्रग्ज घेऊन पुण्यातून सोलापूरच्या दिशेने निघाले. ग्रामीण पोलिसांची हद्द सहजपणे पार करत शहरात आले ज्याने ड्रग ची मागणी केली होती त्याने दोघांनाही विजापूर वेशीत बोलावून घेतले. सुफियान व तौफिक चारचाकी घेऊन बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजापूर वेशीत आले. सुरवातीला दोघांनीही आजूबाजूचा अंदाज घेतला. एकजण गाडीच्या स्टिअरिंगवर बसूनच होता.त्यावेळी त्या परिसरात दोन गाड्या पहिल्यां आणी संशय 

आला. त्यावेळी त्यांनी चारचाकी रूपाभवानी मंदिरमार्गे तुळजापूरच्या दिशेने घेतली. जेलरोड पोलिसांची दोन पथके त्यांचा पाठलाग करीत होते, पण तामलवाडीच्या टोल नाक्याजवळ त्यांची गाडी बंद पडली. गाडीतून उतरून दोघेही पळून जाऊ लागले त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्या चारचाकीसहा एमडी ड्रग 

असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.