Type Here to Get Search Results !

अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी, उत्तर तहसील कार्यालय येणार चौकशीच्या कचाट्यात




सोलापूर (प्रतिनिधी ) नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्याने अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने ही खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.


उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे खरातने सुमारे ४ हेक्टर ४८ आर (११ एकरहून अधिक) जमीन खरेदी केली आहे. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्कामुळे बहामार्गाच्या रेखांकनाची माहिती


आधीच मिळाल्याच्या आधारेच त्यांनी ही जमीन घेतल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.


महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिक मोबदला मिळावा यासाठी खरातने दहा ते बारा फूट उंचीची आंब्याची झाडे आणून लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूसंपादन मोबदला प्रक्रियेत जास्त भरपाई मिळवून देणाऱ्या डाळिंब पिकाची नोंदही उताऱ्यावर करून घेतल्याचे सांगितले जात आहे.


या प्रकारामुळे रस्ते प्रकल्पाती भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाण घोटाळे होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात संबंधितांना मदत करणारे अधिकारी कोण, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.