सोलापूर (प्रतिनिधी ) पंढरपुरात एका पत्रकाराला लोखंडी रॉडने व कोयत्याच्या मुठीने तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेतील जखमी पत्रकाराने पंंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपुरच्या संतपेठ परिसरातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत जखमी झालेले पत्रकार रफिक अब्दुलरज्जाक अत्तार वय ३६ वर्ष राहणार न्यु बागवान मोहल्ला, संतपेठ पंढरपुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
दिनांक चार मार्च रोजी
रोजी रात्री नऊ वाजणेचे सुमारास रफीक आतार हे घरी असताना त्यांचा भाऊ तौफीक याचे व जुनेद
बागवान व इतर त्यांचे नातेवाईक यांचेत त्यांचे घराजवळच, पंंढरपूर गोपाळपूर रोडवर साई किराणा स्टोअर्स चे समोर भांडण चालु होते . याठिकाणी रफीक आतार हे गेले आणि डमडमच्या व्यवहारावरुन सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी जुनेद यास सदर व्यवहाराबाबत माझे भावाशी भांडु नकोस असे रफीक आतार म्हणाले असता जुनेद अन्वर बागवान याने त्यांना तु आमच्या व्यवहारामध्ये पड्डु नकोस असे म्हणुन शिवीगाळी दमदाटी करुन त्याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने आतार यांचे डोक्यात मध्यभागी मारुन जखमी केले तसेच उमर सिंकदर बागवान याने कोयत्याच्या मुठीने पाठीत व गुडघ्यावर मारहाण केली, तसेच मस्जित रहिमान बागवान व अमन अन्वर बागवान, मोहसीन मस्जिद बागवान सर्व राहणार न्यूज बागवान मोहल्ला पंंढरपूर यांनी पत्रकार रफीक आतार व त्यांचे भाऊ तोफीक यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आतार यांचे वडील अब्दुलरज्जाक हे भांडण सोडविणेस आले असता त्यांनाही जुनेद बागवान व अमन बागवान यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन ते तेथुन निघुन गेले. असे फिर्यादीत नमूद केले असुन मारहाण केलेबाबत संबंधित पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत जखमी झालेले रफीक आतार यांचेवर उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचार सुरु करण्यात असुन अधिक तपास पोलीस करत आहेत.
