Type Here to Get Search Results !

डॉ.ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले खासदारकीचे प्रमाणपत् आई-वडिलांची उपस्थिती: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घुमणार सोलापूरचा आवाज



सोलापूर (प्रतिनिधी ) शिवसेनेच प्रवक्त्या मुलुख मैदानी तोफ  डॉ ज्योती  वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे राज्याच्या विधानसभेच्या सचिवांनी त्यांना निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले. आई सावित्री व वडील नागनाथ वाघमारे यांच्यासमवेत डॉ. वाघमारे यांनी बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. मुलगी खासदार झाल्याचा आनंद यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सोमवारी (ता. ९) महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात उमेदवारांची खासदार म्हणून अधिकृतपणे बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, भाजपचे नेते विनोद तावडे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजपच्या माया इवनाते व रामराव वडकुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यासह शिवसेनेच्या डॉ. ज्योती वाघमारे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कारण सात जागांसाठी सात जणांचेच अर्ज आले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार त्या सर्वांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

आता हे प्रमाणपत्र घेऊन या सर्वांना राज्यसभेत जाऊन शपथ घ्यावी लागणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असणार आहे. राज्याच्या विधानसभेच्या सचिवांनी नूतन सहा खासदारांना  प्रमाणपत्रे दिली. दरम्यान, सोलापूरच्या नूतन राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे  यांचा आवाज आगामी पावसाळी अधिवेशनात घुमणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.