सोलापूर (प्रतिनिधी ) गणेशोत्सवापासून सोलापूर शहर पोलिसांनी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली आहे. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका डीजेमुक्त व्हाव्यात, यासाठी पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठका घेत आहेत. आज एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात बैठक झाली. डीजेला बंदी असल्याने कोणत्याही मंडळाने डीजेसाठी अॅडव्हान्स देऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी आवाजाची मर्यादा निश्चित झाली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाउडस्पीकर किंवा साऊंड सिस्टीम वापरण्यावरही निर्बंध आहेत. तरीपण, राज्यात सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत 'डीजे'चा दणदणाट ऐकायला मिळत होता. त्याचा त्रास मिरवणूक मार्गावरील रहिवासी, दवाखान्यातील रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर 'सकाळ'च्या पुढाकारातून 'डीजेमुक्त सोलापूर कृती समिती' स्थापन झाली. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शाळकरी मुले, सर्वसामान्य सोलापूरकरांनी 'डीजे' बंदीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी
'डीजे'वर कायमचे निर्बंध घातले. त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलबजावणी करीत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही डीजेमुक्त निघतील, असा विश्वास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यांमधील बैठकांमध्ये सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आवाजाची मर्यादा पाळून मंडळांना मिरवणुकीत चार स्पीकर लावता येतील, असे यावेळी सांगण्यात आले.
*मंडळांना सूचना*
मंडळांनी विनापरवाना मिरवणूक काढू नये.
कोणीही मिरवणुकीत 'डीजे 'चा वापर करू नये, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. विनापरवाना डीजिटल फलक लावू नये, लेझर लाईटचा वापर करू नये.
मिरवणुकीत डीजेचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई होईल आणि डीजे जप्त केला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर श 'डीजे' साठी बंदी आहे. आतापर्यंत सर्वच मिरवणुका डीजेमुक्त निघाल्या आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुका देखील डीजेमुक्त निघतील तत्पूर्वी, सर्व मंडळांच्या पदाधिकऱ्यांच्या पोलिस ठाण्यांमध्ये बैठका घेऊन त्यासंदर्भातील आवाहन केले जात आहे कोणी डीजे बुकिंग केल्यास त्यांचे होऊ नये, हा त्यामागील हेतू असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
