Type Here to Get Search Results !

नवीन विडीघरकुल मधील बोगस डॉक्टरांच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर तालुका आरोग्य अधिकारीच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करत अमोल कुलकर्णी यांची उपसंचालक यांच्याकडे तक्रार.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे डॉ तैहसित तैयब शहापुरे (शाह क्लिनिक) डॉ नजनीन तैयब शहापुरे (शाह क्लिनिक) डॉ विनोद भगवानदास रोडा (जय शंकर क्लिनिक) हे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवी विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचा रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी व बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करायला हवेत त्याच बरोबर तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कारवाई करायला हवी परंतु तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचवतात बोगस डॉक्टर वर कोणतेही कारवाई करत नाहीत तरी वरील डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी आरोग्य उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.