सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची पत्रकारांच्या विविध विषयावर चिंतन बैठक घेण्यात आली
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी होते या चिंतन बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली
गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे
*आंदोलने तीव्र केल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत....... प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रतिपादन
या चिंतन बैठकीत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकारवर निशाणा साधत राज्यसरकार च्या उदासीन धोरणामुळे राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न शासन दरबारात धूळ खात पडत असून राज्यसरकार ला पत्रकारांच्या अडचणीचा विसर पडला असून पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर व्यापक सुरूपाचा लढा अधिक तीव्र करावा लागेल असे परखड मत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी या चिंतन बैठकीत व्यक्त केल असून आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार पत्रकारांना करावा लागेल त्याशिवाय प्रश्न सुटणार नसल्याचे ठासून सांगितले आहे
या चिंतन बैठकीला पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक गणेश निंबाळकर सचिव रमेश दग्गारी दक्षिण सोलापूर अध्यक्ष अमित राठोड प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी इम्रान आत्तार इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
