सोलापूर (प्रतिनिधी ) रमजान ईद उत्सवानिमित्त विजापूर वेस परिसरात मोठ्या प्रमाणात मीना बाजार भरविण्यात येणार असल्याने त्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी सोलापूर शहर पोलिसांकडून विशेष वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) अंतर्गत आदेश जारी करून 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 21 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत विजापूर वेसकडे जाणाऱ्या काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
*या मार्गांवर वाहनांना बंदी*
मीना बाजाराच्या पार्श्वभूमीवर खालील मार्गांवरून विजापूर वेसकडे वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.बेगम पेठ पोलीस चौकी ते विजापूर वेस
बाराईमाम चौक ते विजापूर वेस
बाकळे प्रेस ते विजापूर वेस लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस पंचकट्टा ते विजापूर वेस पेंटर चौक ते विजापूर वेस रंगरेज बोळ ते विजापूर वेस माणिक चौक ते विजापूर वेस
तथापि रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने यांना या निर्बंधातून अपवाद देण्यात आला आहे.
*पर्यायी मार्गांची व्यवस्था*
वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे..
माणिक चौक - समाचार चौक – भावसार पथ - बाराईमाम चौक - किडवाई चौक मार्गे इच्छित स्थळी बेगम पेठ पोलीस चौकी - पंचकट्टा - लक्ष्मी मार्केट - दत्त चौक मार्गे इच्छित स्थळी
मीना बाजारामुळे विजापूर वेस परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या वाहतूक बदलांचे पालन करावे, असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हा आदेश पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या स्वाक्षरीने 12 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला आहे.
