सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस आयुक्त म्हणून शहराचा पदभार घेतल्यापासून शहरात शांतता व कायदा सूव्यवस्था अबाधित राखली जावी म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का व तडीपार सारख्या प्रभावी कारवाया केला आहेत आता पुन्हा सोलापूर शहरात गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, मारामारी करणे व सामान्यांना साथीदारांसह मारहाण करून दहशत
निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना शहर पोलिसांनी सोलापूर शहर-जिल्ह्यातून तडीपार केले आहे. विशाल राजू गोखले (वय २३, रा. मद्दा झोपडपट्टी, अशोक चौक) व आदित्य ऊर्फ छोट्या आद्या शिवाजी भोसले (वय २६, रा. औसे वस्ती, लक्ष्मी पेठजवळ (दमानी नगर )
अशी त्या दोघांची नावे आहेत. सोलापूर शहरात
सार्वजनिक ठिकाणी दंगा करून सामान्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर त्यांच्या हद्दीतील फौजदार चावडी व जेलरोड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. विशाल गोखले याच्यावर २०२१, २०२३ व २०२५ या काळात दंगा करणे, दहशत माजवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार
करावे, असा प्रस्ताव जेलरोड पोलिसांनी पोलिस आयुक्तालयास पाठविला होता. दुसरीकडे आद्या भोसलेविरुद्ध २०१८, २०२३ व २०२५ या काळात फौजदार चावडी पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव फौंजदार पोलिस ठाण्याकडून पोलिस आयुक्तालयाकडे आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील विशाल गोखले व आद्या भोसले विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली.एकंदरीत सोलापूर शहरातील गुन्हेगारावर तडीपारी सारख्या कारवाई केल्याने गुंड प्रवृत्ती च्या लोकांवर जरब बसला असून शहरात शांतता कायदा सूव्यवस्था नांदत आहे शेवटी पुन्हा एकदा गुंडोवालों जरा होशियार यहाँ कें हम हें राजकुमार या लोकप्रिय डॉयलॉग ची प्रचिती सोलापूरवासियांना आली आहे
