Type Here to Get Search Results !

चर्चा घाला चुलीत अगोदर निरीक्षकांवर कारवाई करा यशवंत पवार यांचे 2 ऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील जुना विडी घरकुल परिसरात अनेक शासनमान्य बिअर शॉपी असून अनेक बिअर शॉपी मध्ये नियमबाह्य बेकायदेशीर पणे देशी विदेशी मद्य विक्री केली जाते त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळी ही बिअर शॉपी सुरु असतात. या भागातील बिअरशॉपी तब्बल रात्री 12 वाजेपर्यंत बिनधास्त पणे सुरु ठेवातात कायदा व नियम धाब्यावर बसवून त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व नियम व अटी पायदळी तुडवत या बिअर शॉपी खुलेआम पणे सुरु असतात अगदी लोकवस्तीत देशी विदेशी मद्य कधीही कोठेही मिळत असल्याने तळीराम देखील खूष असतात हेच तळीराम बिअर शॉपी मध्ये रात्री उशीरा मद्य मिळत असल्याने दारू पिऊन धिंगाणा घालणे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे महिलांना लज्जास्पद वर्तन करणे आपसात मोठयाने बोलणे हा प्रकार नेहमीच सुरु असून या बिअरशॉपी मुळे या भागातील अनेक नागरिक त्रस्त आहेत या बाबत पत्रकार यशवंत पवार यांनी पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून जुना विडी घरकुल परिसरातील देशी विदेशी मद्य विक्री त्याच बरोबर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बिअर शॉपी चालकावर कारवाई करावी म्हणून दिनांक 27/11/2025 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सोलापूर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती तब्बल 3 महिने उलटून गेले तरी या बिअरशॉपी चालकावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही केवळ कार्यालयात बसून अन कागदी घोडे नाचवून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कारभार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पत्रकारांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा गंभीर आरोप यशवंत पवार यांनी केला असून जुना विडी घरकुल मधील बेकायदेशीर देशी मद्य विक्री करणाऱ्या व मध्य रात्री पर्यंत बिअर शॉपी चालू ठेवणाऱ्या चालकांना राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असून बिअर शॉपी मध्ये देशी विदेशी मद्य विक्री तसेच रात्री 12 वाजेपर्यंत बिअर शॉपी उगडी ठेवणाऱ्या बिअर शॉपी चालकांवर त्याच बरोबर बिअर शॉपी चालकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांवर कारवाई करण्यात यावी म्हणून यशवंत पवार यांनी दिनांक 12/2/2026 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती जुना विडी घरकुल मधील रात्री उशिरा पर्यंत देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या बिअर शॉपी चालक व अश्या बिअर शॉपी चालकांना पाठीशी घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांवर कारवाई करण्यासाठी पत्रकार यशवंत पवार यांनी 12/3/2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं असून कारवाई बाबत चर्चा निष्फळ झाली असून यशवंत पवार हे राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांवरील कारवाईवर ठाम असल्याने सलग 2 ऱ्या दिवशी देखील बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.