Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची फेर नियुक्ती. कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांची माहिती




सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे 

पत्रकार सुरक्षा समितीच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची फेर निवड पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी जाहीर केली असून लवकरच त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार होणार आहे. 

*जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांचा अल्प परिचय*

 नंदकुमार बगाडे पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्यांना लहानपणापासून पत्रकारिताची आवड व आकर्षण होते समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे ही भूमिका असल्याने जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील हे वेगवेगळ्या माध्यमातून लेखन करत असून तळागाळाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत

जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांनी यापूर्वी 

पत्रकार सुरक्षा समितीच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली त्यांचे काम समाधान कारक असल्याने असून त्यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली आहे 

जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.