Type Here to Get Search Results !

शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, कर्तव्य कष्ट अन जिद्दीच्या जोरावर भागवत शिंदेची भारत श्री स्पर्धेत देशात पाचवी दैदित्यमान कामगिरी




सोलापूर (प्रतिनिधी) शहर पोलीस दलात विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ४०+ ‘भारत श्री’ मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशात पाचवा क्रमांक पटकावून सोलापूर शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पोलीस खात्यातील धकाधकीच्या व जबाबदारीच्या कामातून वेळ काढत, शिस्तबद्ध सराव व कठोर मेहनतीच्या जोरावर शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. कर्तव्य आणि छंद यांचा उत्तम समतोल साधत त्यांनी तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे, भागवत शिंदे यांची सुकन्या देखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवून चमकदार यश संपादन केल्याने शिंदे कुटुंबाच्या क्रीडा परंपरेचा लौकिक व गौरव अधिकच वाढला आहे.




   या यशाबद्दल भागवत शिंदे यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन उपायुक्त( परिमंडळ) विजय कबाडे उपायुक्त ( गुन्हे विभाग) अश्विनी पाटील विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी भागवत शिंदे यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत त्याच बरोबर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही भागवत शिंदे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.