Type Here to Get Search Results !

झिरो कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सह दुय्यम निबंधक विरोधात पत्रकार अमोल कुलकर्णी यांची मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार.




सोलापूर (प्रतिनिधी) शहरातील सह दुय्यम निबंधक उत्तर 1 उत्तर 2 उत्तर 3 व दक्षिण सोलापूर तालुका येथील कार्यालयाती झिरो कर्मचाऱ्यांना कार्यालय बाहेर करण्याबाबत पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी दिनांक दिनांक 27/ 11/2025 रोजी जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती एक महिना उलटून गेला तरी पत्रकार कुलकर्णी यांच्या तक्रारी च्या अनुषंगाने झिरो कर्मचाऱ्यांची सह दुय्यम निबंधक यांनी हाकालपट्टी न केल्याने अखेर अमोल कुलकर्णी यांनी 26 जानेवारी पासून गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून त्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा 9 वा दिवस असून दिवसेंदिवस पत्रकार अमोल कुलकर्णी यांची तब्बेत खराब होत चालली आहे माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास झिरो कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सह दुय्यम निबंधक जबाबदार असतील अशी लेखी तक्रार पत्रकार अमोल कुलकर्णी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे तसेच तक्रारी च्या अनुषंगाने उत्तर 1 उत्तर 2 उत्तर 3 व दक्षिण मधील झिरो कर्मचाऱ्यांची तात्काळ हाकालपट्टी करावी अन्यथा नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान आंदोलनकर्ते कुलकर्णी यांची तब्बेत खालावत असून त्यांना उपचाराची गरज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.