सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी विविध भागात परिमंडळ कार्यालय कार्यरत असून ही परिमंडळ कार्यालय अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अंकित येतात सोलापूर शहरात एकूण 04 परिमंडळ कार्यालय असून त्यात अ विभाग ब विभाग क विभाग व ड विभागाचा समावेश आहे शहरातील रेशन प्रणाली सुव्यवसस्थित चालावी त्याच बरोबर शिधापत्रिका धारकांना धान्य वेळेवर मिळावे त्याच बरोबर नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका विभक्त शिधापत्रिका युनिट वाढ, कमी सह झोन बदल अशी नागरिकांची शासकीय कामे याच परिमंडळ कार्यालय मधून केली जातात या चार परिमंडळ कार्यालयावर अन्नधान्य वितरण अधिकारी यांची देखरेख असते.
*झिरो कर्मचाऱ्यांचा उन्माद परिमंडळ अधिकारी यांची सोयीस्कर डोळे झाक*
सोलापूर शहरातील पार्क चौकात परिमंडळ कार्यालय ड विभाग असून या परिमंडळ कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून बेकायदेशीर पणे इमरान व कर्नूल नावाचे झिरो कर्मचारी काम करत आहेत हे झिरो कर्मचारी शिधापत्रिका संदर्भातील नवीन शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका विभक्त शिधापत्रिका युनिट वाढ कमी व इतर कामे करत असून बेकायदा शासकीय दप्तर, दस्तऐवज हाताळत नागरिकांकडून पैसे उकळूत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून अश्या बेकायदेशीर काम करणाऱ्या झिरो कर्मचाऱ्यांना परिमंडळ अधिकारी ड विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नागरिक करत असून वर्षानुवर्षे याच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या इमरान व कर्नूल या झिरो कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर का केलं जात नाही ? असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात असून शिधापत्रिक धारकांची आर्थिक लूट करणाऱ्या झिरो कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
