Type Here to Get Search Results !

कानून के हात लंबे होते हें रुपाभवानी मंदिराजवळील अपघात प्रकरणी चालकास अहिल्यानगर येथून अटक जोडभावी पेठ पोलिसांची कामगिरी




सोलापूर (प्रतिनिधी ) सोमवारी (ता. १६) पहाटे साडेचारच्या सुमारास टेम्पोच्या धडकेत सोलापूर शहरातील तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर दुचाकीवरील दोघे बाजूला रस्त्यावर पडले होते, एकजण टायरखाली आला होता. त्याला बाजूला आणून त्या दोघांजवळ ठेवले. त्यावेळी रस्त्याने जाणारा एक व्यक्ती जोरात ओरडला आणि घाबरून मी पळून गेलो, असे टेम्पो चालक प्रवीण संजय खराडे (रा. शिरसगाव काटा, जि. पुणे) म्हणाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा गावातून टेम्पोत (एमएच १६, सीई ९१४७) कोल्ड्रिंक्स


भरून संशयित आरोपी प्रवीण खराडे सोलापुरात आला होता. त्यावेळी रुपाभवानी मंदिराजवळील चौकात टेम्पोसमोर आलेल्या दुचाकीला जोरात धडक बसली. त्या अपघातात दुचाकीवरील नागेश प्रकाश गवंडी (वय २७, रा. रविवार पेठ), रोहन अशोक कोरे (वय २३, रा. श्रीशैल नगर, भवानी पेठ) व बसवराज सुनील चनशेट्टी (वय २५, रा. बाळशेट्टी नगर, शेळगी) या तरुणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोघेजण बाजूला जोरात आपटले तर एकजण टेम्पोखाली आला होता. त्याला बाहेर काढले आणि दोघांजवळ ठेवले. त्यावेळी रस्त्यावरून जाणारा एक व्यक्ती ओरडला आणि घाबरून टेम्पो सुरु करून चालक तरुणांना दवाखान्यात घेऊन न जाता तसाच पळून गेला. पोलिसांनी टेम्पोच्या मालकाचा शोध घेऊन चालकाची माहिती घेऊन त्याला रात्री साडेबारा वाजता अटक केली. तेथून जोडभावी पेठ पोलिस सोलापुरात आले. मंगळवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास त्याला न्यायालयात

हजर करण्यात आले. चालकातर्फे अॅड. आकाश देठे, अॅड. श्रीपाद देशक यांनी तर सरकारतर्फे अॅड. वैशाली बनसोडे यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने चालकास एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली. अपघाताचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मुकेश गायकवाड तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.