Type Here to Get Search Results !

शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य टांगणीला




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात जुना विडी घरकुल नई जिंदगी परिसर जुना कुमठा नाका एम आय डीसी हद्दीतील सुनील नगर जुना विडी घरकुल या भागातील अनेक ठिकाणी रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बरेच बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील सोलापूर शहरातील या भागात कोणतीही डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे सोलापूर शहरातील या भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी शहर आरोग्य अधिकारी (सोलापूर महानगर पालिका ) कोणतेही प्रयत्न करीत नसल्याची चर्चा या भागातील नागरिकांमधून केली जात असून आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालेले दिसत आहे अश्या बोगस डॉक्टरांना अभय कोणाचे? असा देखील प्रश्न आता विचारला जात असून या भागातील बोगस डॉक्टर वर शहर आरोग्य अधिकारी कारवाई करणार का नुसते कागदी घोडे नाचवणार? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.