सोलापूर (प्रतिनिधी ) अनेक दिवसांपासून शेतकरी आणि पशुपालकांची झोप उडवणाऱ्या शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईत १८ गुन्ह्यांची उकल झाली असून, चोरीसाठी वापरलेल्या एक चारचाकीसह तीन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या पथकाला संशयित १ चारचाकी गाडी आणि २ मोटारसायकलसह मोहोळ-पोखरापूर रोडवर थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा व्यक्तींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यात त्यांनी मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर तालुका आणि सोलापूर परिसरात शेळ्या आणि मोटारसायकल चोरीचे एकूण १८ गुन्हे केल्याची कबुली वापरलेली १ चारचाकी गाडी आणि २ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. संशयित आरोपींना कार्यवाहीसाठी मोहोळ पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भिमगोंडा पाटील पीएसआय कुलदीप सोनटक्के, प्रकाश कारटकर तसेच सलीम बागवान, विजय भरले, शशी कोळेकर, विरेश कलशेट्टी, धनराज गायकवाड, सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, राहुल दोरकर, हरीश थोरात व चालक दिलीप थोरात यांनी मिळून केली.
