Type Here to Get Search Results !

उदंड जाहली सावकारी 12 टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 85 लाखांचा गंडा : जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु






सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील ‘साईराज फायनान्स’ या संस्थेचे सचिन नामदेव भडंगे यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.तक्रारदार पुनम धनंजय ढवळे (वय ४० वर्षे, रा. होमकर नगर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सचिन भडंगे याने फिर्यादीचे दिवंगत सासरे शामसुंदर ढवळे यांना साईराज फायनान्समध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले होते. ‘गुंतवणुकीवर दरमहा १२ टक्के दराने परतावा देऊ’ असे आमिष दाखवून त्याने शामसुंदर ढवळे यांच्याकडून रोख व खात्यावर असे एकूण ७९,४८,०००/- रुपये घेतले. तसेच साक्षीदार नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडून ६,००,०००/- रुपये घेतले.अशा प्रकारे एकूण ८५,४८,०००/- रुपये घेऊन, कोणतीही रक्कम किंवा परतावा परत न देता सचिन भडंगे याने फिर्यादी व साक्षीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर, जोडभावी पोलीस ठाणे येथे सचिन नामदेव भडंगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धाकाल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि पेटकर करत आहेत.
गुंतवणूकदारांना आवाहन: सोलापूर शहरातील ज्या गुंतवणूकदारांनी ‘साईराज फायनान्स’ या कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांना परतावा मिळालेला नाही, अशा सर्व ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर या ठिकाणी उपस्थित राहून आपली माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.