Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरात ५ ठिकाणी घरफोडी; सराईत आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद 03 लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत अरविंद माने यांच्या टीमची दमदार कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी )

सोलापूर शहरात विविध भागांत घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून ५१ ग्रॅम (५.१ तोळे) सोन्याचे दागिने व ८२० ग्रॅम (८२ तोळे) चांदीचे दागिने असा एकूण ३,७२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग डॉ. अश्विनी पाटील व सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

          गुप्त माहितीच्या आधारे सापळा


दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सदर बझार पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. १०६०/२०२५) भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(३) अन्वये दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून संशयितास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

            आरोपीची ओळख


अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किसन महादेव व्हनकोरे (वय २९) असे असून तो सध्या दादावस्ती, लोहगाव, पुणे येथे वास्तव्यास आहे. मूळ गाव – वाघदरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर. व्यवसायाने मजूर असलेला हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

५ गुन्ह्यांची उकल

तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपासाद्वारे आरोपीने सोलापूर शहरात एकूण ५ घरफोड्या केल्याची कबुली दिली. यामध्ये सदर बझार व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील खालील गुन्ह्यांचा समावेश आहे:

गु.र.नं. १०६०/२०२५ – भा.न्या.सं. ३०५, ३३१(३)

गु.र.नं. ५६/२०२६ – भा.न्या.सं. ३०५(a)

गु.र.नं. ५७/२०२६ – भा.न्या.सं. ३०५(a), ३३१(३)

गु.र.नं. २१२/२०२६ – भा.न्या.सं. ३०५(a), ३३१(३), ३३१(४)

गु.र.नं. ९०६/२०२५ – भा.न्या.सं. ३०५(a), ३३१(३), ३३१(४)




           सातत्यपूर्ण तपासातून यश

गुन्हे शाखेने सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीच्या आधारे ही मालिका उघडकीस आणली. चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी मोठा हिस्सा परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड तसेच पथकातील नंदकुमार गायकवाड वजीद पटेल योगेश बर्डे अनिल जाधव महेश शिंदेकुमार शेळके संजय साळुंखे महेश पाटील राजू मुदगल अजिंक्य माने महेश रोकडे राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड भारत पाटील चालक महेंद्र ठोकळ श्याम सुरवसे बाळू काळे सतीश काटे सायबर सेल कढील प्रकाश गायकवाड मछिंद्र राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.