Type Here to Get Search Results !

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नंतर पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांचे बनावट खाते सायबर पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यानंतर बुधवारी (ता. २८) सायबर गुन्हेगारांनी पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यामुळे त्यांना व्हाट्सअप स्टेट्स ठेवून संपर्कातील व्यक्तींना त्याबद्दल माहिती द्यावी लागली. संकेत देवळेकर यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी बनावट खाते बंद केले आहे.सोलापूर ग्रामीण चे पोलीस

 उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मूळ फेसबुक खाते इंग्रजी नावाने असून नऊ हजारांवर फॉलोअर्स आहेत. प्रोफाईलवर त्यांचा स्वतःचा फोटो असून तिरंग्याला सलामी देतानाचा दुसरा फोटो आहे.मात्र सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मूळ फेसबुकवरील एक फोटो घेऊन आणि आई-वडिलांसमवेत असलेला एक फोटो वापरून हिंदीत बनावट फेसबुक अकाउंट उघडले. ज्यावर १०६ फ्रेंड्स दिसत होते. सायबर गुन्हेगाराने त्या बनावट खात्यावरून त्यांच्याच भावाला आणि दुसऱ्या दोघांना काही मोबाईल नंबर मागितले. त्यावेळी याची माहिती श्री. संकेत देवळेकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांना सांगून ते बनावट फेसबुक खाते बंद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले होते. त्याआधी तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेही असेच खाते उघडण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.