सोलापूर (प्रतिनिधी) महापालिकेत गटनेता आणि स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षात अंतर्गत मतभेद सुरू झाले आहेत. गटनेता आणि स्वीकृत नगरसेवक ठरविण्यावरून मोठा गोंधळ सुरू आहे. जनतेने नाकारलेल्या फिरदोस पटेल यांना मागच्या दारातून पुन्हा महापालिकेत बसविण्याची तयारी जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची सुरू आहे. तर दुसरीकडे एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी शौकत पठाण हे एमआयएमचे नेते नाहीत, त्यांना कोणतेच अधिकार नसल्याचे पत्र आयुक्तांना दिले आहे.
महापालिका निवडणुकीनंतर सभागृहात पक्षांचे गट निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिका नगरसचिवांनी सर्व पक्षाध्यक्षांसह एमआयएमचे शौकत पठाण यांना गटनेता निवडीबाबत पत्र पाठविले होते.
आठही नगरसेवक म्हणाले, शौकत पठाण आमचे नेते नाहीत
*पक्षाचे नेतृत्व कोणाकडे* ?
जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांना नगरसेवकांनी थेट पक्षाच्या कारभारा-तून बाजूला सारले आहे. त्यामुळे एमआयएम पक्षात गटनेता कोण होणार, स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला संधी मिळणार, पक्ष नेतृत्वाची जबा-बदारी कुणाकडे जाणार आणि महापालिकेतील भूमिका कोण ठरवणार, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र हे पत्र मिळताच एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. शौकत पठाण यांना कोणतेच अधिकार नाहीत. पक्षाचा निर्णय होईपर्यंत कोणतेही नाव गटनेता म्हणून ग्राह्य धरू नये. आमचा अधिकृत गटनेता अद्याप निश्चित झालेला नाही, असे पत्र आठही नगरसेवकांच्या स्वाक्षरीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आले आहे. शहराध्यक्ष नसताना कोणालाही पक्षाचा गटनेता म्हणून मान्यता देता येणार नाही
असेही निवेदनात सांगण्यात आले आहे.
या भूमिकेसंदर्भात आठ नगरसेवकांनी एकत्र येत पत्र स्वाक्षरी केली. मात्र नेतृत्वाबाबत पक्षात एकवाक्यता नसल्याने एम आयएम पक्षातही गोंधळ सुरू आहे. दरम्यान निवडणुकांपूर्वी शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनलाआहे.
