सोलापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर : परिक्षेत्राचे
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणला झाली आहे.
पोलिस महानिरीक्षक फुलारी यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील गजानन सरगर यांची बदली सांगली, पुणे ग्रामीणचे
अभिजित देशमुख यांची बदली सांगलीला, साताऱ्यातील राजेंद्र सावंत्रे यांची आणि सांगलीतील सतीश शिंदे यांची बदली कोल्हापूरला झाली आहे. बदली झालेल्या निःशस्त्र पोलिस निरीक्षकांना तत्काळ बदलीचे आदेश पोचवून कार्यमुक्त करावे. त्यांच्या ठिकाणी पर्यायी किंवा बदलीवर येणाऱ्या निःशस्त्र पोलिस निरीक्षकांची वाट पाहू नये, असेही आदेशात नमूद आहे. त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा. ज्या ठिकाणी बदली झाली तेथे कार्यमुक्तीनंतर रुजू न झाल्यास त्यांचा अहवाल पोलिस महासंचालकांना पाठवावा, असेही त्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. शेडगे यांच्या जागेवर आता कोणाची नेमणूक होणार, याकडे मोहोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
