Type Here to Get Search Results !

वडजी तांड्यावरील हातभट्यावर छापे ' ऑपरेशन परिवर्तन' मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलिसांची दमदार कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी) ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत विशेष मोहीम राबवून सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडजी तांडा, शिवा तांडा, बक्षीहिप्परगा येथे चोरून पेटवलेल्या हातभट्ट्या नष्ट केल्या. तसेच एमआयडीसी, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथे हातभट्टीची विक्री करणाऱ्यांवरही छापे टाकले. हातभट्या आणि हातभट्टीची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून पोलिसांनी आठ लाख ८५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये १६ हजार ८०० हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, हातभट्टी दारू, बरैल व लोखंडी बॅरेलमधील हातभट्टी,निर्मिती निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले

 बॅरेल फोडून गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले. दरम्यान, एमआयडीसी, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथे चोरून हातभट्टी व देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्यांकडून १८२० रुपयांची हातभट्टी व नऊ देशी- विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत


.ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे उपनिरीक्षक श्री. घोळवे, श्री. बागवान सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर कोडक, पोलिस हवालदार महेश कटकधोंड, सागर ननवरे, विलास लोखंडे, दीपाली खोत यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.