सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर महानगरपालिका निवडणूक मधे प्रभाग क्रमांक १ क मधून सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते श्रीकांत गायकवाड यांच्या पत्नी शिलवंत श्रीकांत गायकवाड या वंचित बहुजन आघाडी वतीने गॅस टाकी या चिन्हावर उभे आहेत श्रीकांत गायकवाड आणि शिलवंत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जनतेच्या रेट्यातून ही उमेदवारी दिली असल्याची शिलवंत श्रीकांत गायकवाड यांनीं माध्यांशी बोलताना सांगितले,या प्रभागात अनेक विकास कामे रखडली असून नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण असल्याचे देखील चित्र आहे.या सर्वाचा विचार करून निवडून आल्यानंतर रखडलेल्या सर्व विकास कामांची निश्चिती गायकवाड हे देत आहेत. या प्रभागात सर्व दिग्गज प्रस्थापित भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभे असताना "वंचित बहुजन आघाडी" ने सगळ्यांना घाम फोडला आहे. सामान्य जनतेतून मिळत असलेला जनाधार, अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांचा असलेला रोष दिसून येत आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसून येईल अशी शक्यता परिसरातून वर्तवण्यात येत आहे.यातून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सर्व पक्षातील अधिकृत व अपक्ष उमेदवार प्रभाग परिसर पिंजून काढण्यात व्यस्त आहेत. प्रभाग 1 मधून धक्कादायक "नवीन" निकाल लागू शकतात अशी शक्यता सध्या तरी सर्व स्तरातून वर्तवली जात आहे.
