सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश 10 जानेवारी 2026 रोजी रात्री 00.01 वाजले पासून ते 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहणार आहे. तरी नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी केले आहे.
लागू असलेले प्रतिबंध 1) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास मनाई 2) कोणत्याही प्रकारची मिरवणूक बंदी 3) मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड, फटाके यांचा वापर निषिद्ध
सवलत दिलेले कार्यक्रम विवाह समारंभ अत्यसंस्कार व संबंधित सभा कंपन्या, क्लब, सहकारी संस्था यांची कायदेशीर बैठका सामाजिक मेळावे व संस्थांचे सामान्य व्यवहार चित्रपटगृहे, नाटकगृहे व सार्वजनिक करमणूक कार्यक्रम सरकारी व निमसरकारी कार्य, न्यायालये व कार्यालयीन संमेलने शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक उपक्रम कारखाने, दुकाने व आस्थापनातील व्यापार व्यवहार विभागीय पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीने होणारी संमेलने.
