सोलापूर (प्रतिनिधी ) उत्तर सोलापूरचे तहसीलदार नीलेश पाटील यांच्या कामकाजाची विभागीय चौकशी होणार आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्र्यांनी आदेश दिले आहेत. पाटील यांनी पदभार घेतल्यापासून त्यांचा कारभार वादग्रस्त आहे, महसूल कामकाजात पारदर्शकता नाही. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. तर मंगळवारी महसूल मंत्र्यांना पत्रही दिले. यावर महसूलमंत्र्यांनी तत्काळ विभागीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भाग व सोलापूर शहर कार्यक्षेत्रात असणाऱ्या उत्तर तहसील मध्ये लाचखोरी उच्चतम पातळीला गेल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. गेल्याच आठवड्यात भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणावरून एका संघटनेने तहसीलदारांच्या नाम फलकाला काळे फासले. या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले होते त्यांच्या पत्रानुसार चालू अधिवेशनात तहसीलदार पाटील यांच्या बाबत
तारांकित प्रश्न ही उपस्थित करण्यात आला आहे मंगळवारी अधिवेशनात देशमुख यांनी यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी महसूलमंत्र्यांनी तहसीलदार पाटील यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले ही चौकशी जलद व प्रामाणिक झाल्यास तहसीलदार पाटील यांच्यासह इतर कर्मचारी सुद्धा
कारवाई च्या कक्षेत येतील असा दावा व्यक्त केला जात आहे.
