Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदी युवा पत्रकार राजू वग्गू यांची पुन्हा वर्णी.




सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे शहर प्रतिनिधी युवा पत्रकार राजू वग्गू यांची फेर नियुक्ती केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी दिली आहे 

*युवा पत्रकार राजू वग्गू यांचा अल्प परिचय*

 युवा पत्रकार राजू वग्गू हे सोलापूर शहरातील रहिवाशी असून त्यांना पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्याची आवड असून ते विविध सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असतात राजू वग्गू हे साप्ताहिक कार्यसम्राट चे सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून काम पहात असून लेखणी च्या माध्यमातून शहरातील नागरिकांबरोबर वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्ताचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत युवा पत्रकार राजू वग्गू यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदाची धुरा यापूर्वी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली असून पत्रकार सुरक्षा समितीच्या आंदोलन उपोषण निवेदनात त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने या वर्षी देखील युवा पत्रकार राजू वग्गू यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर कार्याध्यक्ष वर्णी लावली या निवडी बद्दल राजू वग्गू यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.