Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी जेष्ठ पत्रकार बंडू तोडकर यांची फेर निवड




सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे मोहोळ तालुका प्रतिनिधी पत्रकार बंडू तोडकर यांची फेर निवड केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू यांनी दिली आहे 

*पत्रकार बंडू तोडकर यांचा अल्प परिचय*

  पत्रकार अमर पवार हे बेगमपुर तालुका मोहोळ येथील रहिवाशी असून त्यांना पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्याची आवड असून ते विविध उपक्रमात नेहमी सहभागी असतात बंडू तोडकर हे साप्ताहिक कार्यसम्राट चे काम करत असून लेखणी च्या माध्यमातून बेगमपुर सह मोहोळ तालुक्यातील तळागाळांचे वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त नागरिकांचे प्रश्न प्रशासन दरबारात त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत पत्रकार बंडू तोडकर यांनी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी यापूर्वी देखील अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या आंदोलन उपोषण निवेदनात त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने या वर्षी देखील पत्रकार बंडू तोडकर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.