सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर सह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणीसाठी दहा हजार महिला विडी कामगारांसह मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार, असा इशारा विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या महिला विडी कामगारांच्या निदर्शने आंदोलन प्रसंगी महायुती सरकारला दिला.महिला बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीच्या वतीने विष्णू कारमपुरी (महाराज) व डॉ. गोवर्धन संचू आणि साहेबांना तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला विडी कामगार बंधू भगिनींनी विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समितीचा विजय असो, किमान वेतनाची अंमलबजावणी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, महायुती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा दिल्या. या प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील या लढ्या अंतर्गत राज्य शासनाच्या पुढील अधिवेशनाला दहा हजार महिला विडी कामगारांचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्यात येईल, असा इशारा दिला.
डॉ. गोवर्धन संचू यांनी आपल्या भाषणात राज्य शासन विडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित न केल्यास कृती समितीच्या वतीने या पुढील आंदोलन तीव्र राहील., त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महायुती सरकार जबाबदार राहील, म्हणून महिला विडी कामगारांचा अंत पाहू नका, वेळ पडल्यास महिला विडी कामगार सरकार खाली खेचण्यास समर्थ आहे असे म्हणाले. निदर्शने आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विष्णू कारमपुरी (महाराज) डॉ. गोवर्धन संचू, सायबन्ना तेग्गेळी. यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शन आंदोलनात अन्नपूर्णा गुंडला, बालमनी विडप, विजया गोसकी, महालक्ष्मी शेरला, वाणी पिस्के, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, लक्ष्मी गुंटला, गुरुनाथ कोळी, रेणुका बोल्ली, श्रीनिवास बोगा, कविता इरावती, लक्ष्मी आडम, नरसम्मा मालपुरी, अंबिका नंदाल, अंजना कोळेकर, लक्ष्मी रच्चा, शोभा बोल्लू, कविता पंडाल, लक्ष्मी यनगुंटला, विठाबाई करली, डॉ. अन्वर होटगीकर, लक्ष्मी येमुल, यांच्यासह महिला बिडी कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
