सोलापूर (प्रतिनिधी )दोन दिवसांत रेकॉर्डवरील तिघा सराईत गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात बदल न झाल्याने महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यांना शुक्रवारी (ता. १९) पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले
मिथुन धनसिंग राठोड (वय ३३. रा. घोडातांडा, ता. दक्षिण सोलापूर), सलमान गुडुभाई पटेल (वय २७, रा. विष्णु नगर भाग दोन, मजरेवाडी, सोलापूर) व अश्रफअली ऊर्फ टिपू मन्त्रान ऊर्फ मुनाफ बागवान (वय ३३, रा. शुक्रवार पेठ. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
मिथुन हा बऱ्याच वर्षांपासून जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीसह परिसरात हातभट्टी दारू अड्डे चालवत होता. तो हातभट्टीची वाहतूक पुरवठा व विक्री करायचा भरधाव वाहने हाकण्यात अस्वछता दहशती मुळे लोकांच्या आरोग्य व जीवितास
धोका निर्माण झाल्याने शहरात त्याच्याविरुद्ध २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर गेल्या दोन वर्षांत दोनदा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सलमान हा साथीदारांसह जेलरोड व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप व रॉड, कोयता, काठी घेऊन फिरायचा. त्याद्वारे , खंडणी मागणे, चोरी विनय भंग गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे बेकायदा जमाव जमवून दमदाटी करणे तडीपार आदेशा चा भंग करणे
, गृहअतिक्रमण करणे,दगड फेक करणे असे गुन्हे करीत आहे. त्याच्याविरुद्ध शहरात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे.
अश्रफअली हाही साथीदारांसह फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप व रॉड, कोयता, काठी घेऊन फिरायचा. त्याद्वारे गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे चोरी विनयभंग करणे
तडीपार आदेशाचा भंग करणे, करणे, धमकावणे आदी गुन्हे करीत आहे. त्याच्याविरुद्ध शहरात सात गुन्हे दाखल आहेत. २०१६, २०१८ व २०२३ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, प्रमोद वाघमारे, महादेव राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम घाडगे, हवालदार विनायक संगमवार, सदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी आदेशाची अंमलबजावणी केली.
