Type Here to Get Search Results !

सोलापूर ग्रामीण घटकातील नगपरिषद व नगरपंचायत निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या आहेत.


दिनांक 21/12/2025 रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने, जिल्हयात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना व आदेश दिले आहेत.


जिल्हयातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकाल शांततेत पार पडावा, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आतापर्यंत एकूण 6102 व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये BNNS. कलम 126 प्रमाणे 3571, BNNS कलम 129 प्रमाणे- 445, BNNS कलम 168 प्रमाणे 1420, BNNS. कलम 163 316, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे 279, एम.पी.डी.ए.07, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे 11 Gangs, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56, 57 प्रमाणे 41, अशा स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.


तसेच मतमोजणी व निकालाच्या पाश्वभुमीवर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण हे स्वतः बंदोबस्तावर बारकाईने लक्ष ठेवून बंदोबस्तामध्ये असुन, तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हयातील 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 19 पोलीस निरीक्षक, 75 पोलीस अधिकारी, 867 पोलीस अंमलदार, 650 होमगार्ड, 03 RCP, 4 QRT पथके, 08 SRPF सेक्शन, तसेच 4 स्ट्राईकींग असा जिल्हयामध्ये भक्कम पोलीस बंदोबस्त जिल्हयात तैनात करण्यात आलेला आहे.


याशिवाय जिल्हयात विविध ठिकाणी 43 पेट्रोलिंग सेक्टर नेमण्यात आलेले असून संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट्स नेमण्यात आलेले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक, बाईक रॅली अथवा अन्य अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.


कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून वाशी, सांगोला, पंढरपूर, अकलुज व इतर संवेदनशील भागांमध्ये ड्रोनब्दोर निगराणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.