सोलापूर (प्रतिनिधी ) विमानतळ परिसरात कोणीही पतंगबाजी अथवा पतंग उडवणार नाही. विमानतळ परिसरातील विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने लेझर लाईट शारपी लाईट अथवा हवेतील हॅलोजन प्रकाश ज्योत टाकणारे लाईट वापरण्यास बंदी असून तसे आढळले कारवाई करण्यात येईल
विमानतळ संरक्षक भिंतीवरून कोणीही आत जाणार नाही तसे केल्याचे आढळल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल विमानतळ परिसरातील मटण विक्रेते यांच्या दुकानातील वेस्टेज विमानतळ संरक्षक भिंती लगत टाकताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करून दुकानचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल याबाबत नोंद घेणे विमानतळ परिसरातील भिंती लगत राहणाऱ्या रहिवाशी यांनी घरावर किंवा उंच जागेवर कोणत्याही प्रकारचा झेंडा अथवा पताका लावू नये सदर प्रकारामुळे विमानसेवेस अडचण येईल असा प्रकार दिसल्यास संबंधितांवर पोलीस प्रशासना कडून कारवाई करण्यात येईल असा इशारा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे.
वरील सूचनाचे उल्लंघन झाल्यास पोलीस प्रशासन वतीने कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली आहे.
