Type Here to Get Search Results !

घरगुती गॅस चा वापर करणाऱ्यावर पुरवठा विभागाची कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी ) पुरवठा विभाग व हिंदुस्तान पेट्रोलियम,भारत गॅस, इंडियन या गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसरच्या संयुक्त पथकाने बाळी वेस येथील श्री अन्नपूर्णा लंच होम येथे छापा मारून घरगुती वापराचा स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरचा व्यापारी तत्त्वावर वापर करताना हॉटेल चालकास पकडले.


या पथकाने मारलेल्या छाप्यात भारत गॅस कंपनीचे वापर करत असलेली भरलेली टाकी सापडली या कारवाईमध्ये नंदकिशोर ढोके परीमंडळ अधिकारी अ विभाग प्रफुल नाईक परीमंडळ अधिकारी क विभाग राजेश यमपुरे प्र.परीमंडळ अधिकारी ब विभाग ज्ञानेश्वर काशीद ब विभाग पुरवठा निरीक्षक, सज्जन भोसले ड विभाग पुरवठा निरीक्षक, सागर चव्हाण HPCL सेल्स ऑफिसर, गौतम सागर IOCL सेल्स ऑफिसर, रघु कुमार BPCL सेल्स ऑफिसर हे सहभागी झाले होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोलापुरात पुन्हा एकदा स्वयंपाकाच्या गॅसचा अवैध वापर सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे कारवाईत सातत्य ठेवावेत अशी मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.