Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट न्यूज प्रतिनिधी युवा पत्रकार अमर पवार यांचा बेगमपूर येथे सत्कार.




मोहोळ (प्रतिनिधी ) अल्पावधीत तब्बल तीन लाख चाळीस हजार वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील 

राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख चाळीस हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.

 कार्यसम्राट न्यूज च्या मोहोळ तालुका प्रतिनिधी पदी युवा पत्रकार अमर पवार यांची नुकतीच फेर नियुक्ती केली होती 

त्यांचा बेगमपुर ता मोहोळ येथे कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल घालून सन्मान करण्यात आला 

 अमर पवार यांचा परिचय

अमर पवार हे युवा व उच्च शिक्षित पत्रकार असून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत समाजातील वंचित पिढीत घटकासाठी युवा पत्रकार अमर पवार नेहमीच प्रयत्नशील असतात त्याच बरोबर ते पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष असून पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात

कार्यसम्राट न्यूज च्या मोहोळ प्रतिनिधी पासून फेर नियुक्ती झाल्याने त्यांचा बेगमपुर येथे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका संघटक महादेव शेवाळे सदस्य वजीर मुलाणी 

महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी युवा पत्रकार अजय तोडकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.