Type Here to Get Search Results !

संवेदनशील पोलीस अधीक्षक बोगस डॉक्टर कारवाई बाबत असंवेदनशील कसे? वळसंग पोलीस ठाण्याचा अजब कारभार पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा यशवंत पवार यांचा इशारा




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवी विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचा रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी व बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी मी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे दिनांक 3/9/2025 रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली होती. त्याच बरोबर नवीन विडी घरकुल परिसरातील वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती देखील केली होती. परंतु संवेदनशील असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अद्याप मला बोगस डॉक्टर कारवाई बाबत कोणताही पत्र व्यवहार झालेला नसल्याने मी नवीन विडी घरकुल परिसरातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्याबाबत वळसंग पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांची समक्ष भेट घेऊन कारवाई ची मागणी केली होती बोगस डॉक्टर कारवाई बाबत तब्बल चार महिने उलटून देखील नवीन विडी घरकुल परिसरातील एकाही बोगस डॉक्टर वर वळसंग पोलिसांनी कारवाई केलेली नाही केवळ चौकशी चा फार्स दाखवून  कागदीघोडे नाचवण्याचा प्रकार केला आहे सदर ची बाब अतिशय गंभीर असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे यावरून संवेदनशील पोलीस अधीक्षक बोगस डॉक्टर बाबत असंवेदनशील कसे ? असा प्रश्न निर्माण झाला असून वळसंग पोलीस ठाण्याचा अजब कारभार चव्हाट्यावर येत असून  बोगस डॉक्टर वर कारवाई न केल्यास वळसंग पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.