सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या दहा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक बातमी चा वेगवान आढावा घेऊन निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखन करून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने पत्रकारिता बरोबरच सामाजिक भान जपलं असल्याचे प्रतिपादन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केलं आहे साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे प्रकाशन मंद्रूप येथील पोलीस ठाण्यात करण्यात आले
संपादक यशवंत पवार हे जेष्ठ पत्रकार असून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळाचे प्रश्न नेहमीच प्रशासन दरबारात मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी वृत्तपत्र केवळ व्यवसाय नसून ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत आहेत दिवाळी अंक प्रकाशन बरोबरच साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र च्या पुढील वाटचालीस मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस श्री मनोज पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
यावेळी संपादक यशवंत पवार महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
