सोलापूर (प्रतिनिधी ) दिनांक 31 10 2025 रोजी राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती याचे औचित्य साधून मा.पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी व मा. श्री संकेत देवळेकर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामती पोलीस स्टेशन वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते.
सदर एकता दौंड मध्ये स्थानिक नागरिक, पत्रकार, नवयुवक, विद्यार्थी , व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील यांचा मोठ्या संख्येने सामील झाले होते. *एक भारत- श्रेष्ठ भारत* या घोषवाक्यखाली सर्वांनी देशातील एकता बंधुता व अखंडता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संकेत देवळेकर यांनी त्यांच्या संदेशातून एकतेचे महत्व पटवून देऊन स्थानिक नागरिकांचे पोलीस पाटील यांचे व पोलीस कर्मचारी यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाची अंमलबजावणी कामती पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर उदार यांनी प्रभावीपणे केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद दीक्षित यांनी केले.
